देवांनी हिंमत न हारण्याचे ज्ञान दिले; ‘शार्ली हेब्दो’ला माणिक जॉली यांनी दिले उत्तर

नवी दिल्ली : पैगंबरांवरील कार्टुन प्रकाशित केल्याने वादात अडकलेल्या फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ (Shirley Hebdo) मॅगझिनने भारतातील कोरोनाच्या (Corona virus) साथीवरून हिंदू देवीदेवतांचा अवमान केला आहे. त्यावर सोशल मीडियातून संताप व्यक्त होत असताना एका युजरने मात्र – आमच्या देवांनी हिंमत न हारण्याचे ज्ञान दिले, असे समजदारीचे उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर ‘शार्ली हेब्दो’चे हे कार्टून व्हायरल होते आहे.

भारतात ऑक्सिनजचा तुटवडा असल्याबद्दल टीका केली आहे. २८ एप्रिल रोजी हे कार्टून प्रकाशित करण्यात आले आहे. यात जमिनीवर पडून भारतीय लोक ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत, असे दाखवले असून ३३ कोटी देवी-देवता, पण एकातही ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता नाही, असे कॅप्शन दिले आहे.

आम्ही हल्ला करणार नाही
गुरुवारी ट्विटरवर शार्ली हेब्दो ट्रेंडिगमध्येही होता. अनेकांनी हे कार्टुन अवमानकारक असल्याचे सांगून शार्ली हेब्दोवर बंदीची मागणी केली आहे. तर अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत या कार्टुनचे समर्थनही केले आहे. माणिक जॉली यांच्या ट्विटर हँडलवरून हे कार्टुन ट्विट करण्यात आले. डियर शार्ली हेब्दो, आमच्याकडे ३३० कोटी देव आहेत. हिंमत न हारण्याचं ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि फ्रेंच नागरिकांचा सन्मान करतो. चिंता करू नका. तुमच्या कार्यालयावर किंवा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला जाणार नाही, असे जॉली यांनी म्हटलं आहे.

दुसरा एक युजर म्हणतो – ३३ कोटी देव निसर्गात आहेत. परंतु भारतीय समाज तुमच्यासारख्या देशांपासून प्रेरणा घेऊन वृक्षतोड करत आहे. आम्ही तर वृक्षांनाही देव मानतो. एका युजरने तर शार्ली हेब्दोची चूक दाखवून दिली – आमच्या देवतांची संख्या तुम्ही ३३० मिलियनवरून ३ कोटी ३० लाख केली आहे. त्याचा मी तीव्र निषेध करतो, असे या युजरने म्हटले आहे. तुमच्या या कार्टुनने आम्ही दुखावलो नाही. तुम्हाला जे छापायचे ते छापा. त्याने आम्हाला फरक पडत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, ते ३३ मिलियन नाहीत तर ३३ कोटी आहेत!

सर्वोच्च न्यायालयाचे वकील ब्रजेश कलप्पा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेव्हा शार्ली हेब्दोने इस्लामविरोधातील कार्टून तयार केले होते, तेव्हा भाजपाच्या आयटी सेलने आनंदोत्सव साजरा केला होता. आता काय होणार? असा प्रश्न कलप्पा यांनी केला आहे. एका युजरने मी फ्रान्स आणि शार्ली हेब्दोच्या बाजूने आहे. शार्ली हेब्दो अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी ओळखले जाते. ते त्यांचे काम करत आहे, असे म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button