मंगळूरू विमानतळ ५० वर्षांसाठी अदानी समूहाच्या स्वाधीन

Adnani

दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आज मंगळूरू विमानतळ अदानी उद्योग समुहाला ५० वर्षांसाठी भाडेतत्वार दिले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही माहिती दिली. लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्क अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ मधील फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता.

लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानतळांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अदानी समूहाला मंगळुरू विमानतळ ५० वर्षांसाठी भाडेतत्वावर दिले आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये अदानी समूहाने देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात प्रवेश केला. सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले होते. समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले होते. पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER