खा. मंडलिक यांच्या पाठपुराव्याने सहा हजार हेक्टरवर शेतकऱ्यांची मालकी

Sanjay Mandlik

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील (Chandgad taluka) हेरे सरंजामबाबतचा प्रश्न सन १९५२ पासून शासनाकडे प्रलंबित होता. खा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि आ. राजेश पाटील (Rajesh Patil), जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांनी पुढाकार घेतला. आता हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावल्याने ४७ गावांतील उर्वरित सहा हजार हेक्टरची मालकी हक्क मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे प्रतिप्रादन खा. मंडलिक यांनी केले.

इनामामध्ये एकूण ४७ गावांतील २२ हजार हेक्टर जमिनीचा हेरे सरंजाम म्हणून अंतर्भाव होता. जमिनींचे पुनर्प्रदान हे नियंत्रित सत्ता प्रकाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर करण्यात आले आहे. सरंजाममधील एकूण २२ हजार हेक्टर जमिनीपैकी १६ हजार हेक्टर क्षेत्राची निर्गती झाली होती. उर्वरित सहा हजार हेक्टर क्षेत्र निर्मितीसाठी प्रलंबित होते.

चंदगडचे तत्कालीन आ. नरसिंगराव पाटील व खा. सदाशिवराव मंडलिक यांनी पाठपुरावा केला होता. गेली १९ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आता निकाली निघाला. या गावांतील वहिवाटदार शेतकऱ्यांना मालक सदरी नोंद घालून सातबारा पूर्ण करण्यात आला. हेरे व मोटणवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER