वयाच्या ४८ व्या वर्षी आई झाली मंदिरा बेदी

Mandira Bedi

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचा नवरा राज कौशल यांच्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे. मंदिरा आणि राज यांनी चार वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले आहे. याबाबत माहिती देताना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्रीने मुलीचे नाव उघड केले.

मंदिरा बेदीला यापूर्वीच एक नऊ वर्षाचा मुलगा आहे. पण तिला मुलींची खूप आवळ आहे. यामुळे मंदिराने गोंडस मुलीला दत्तक घेतले. मंदिराने सांगितले की तिने आपल्या मुलीचे नाव तारा बेदी कौशल ठेवले आहे.

मंदिरा बेदीने कुटुंबासह एक फोटो शेअर केले. एका कवितेच्या माध्यमातून तिने सांगितले की तिने चार महिन्यांपूर्वीच तारा दत्तक घेतले होते. मंदिराने लिहिले की, ‘ती आमच्याकडे आशीर्वादांसारखी आली. आमची छोटी मुलगी तारा. ४ वर्षे आणि लहान वय आणि डोळे तारे सारखे चमकतात. आपल्या भावाची बहीण. ‘

मंदिरा बेदी यांनी पुढे लिहिलं आहे की, ‘उघडेर हात आणि खऱ्या प्रेमाने तिचे घरी स्वागत आहे. आम्ही कृतज्ञ आणि धन्य आहेत. २८ जुलै २०२० रोजी तारा बेदी कौशल आमच्या कुटुंबाचा एक भाग झाली.

मंदिराचे पती राज कौशल यांनीही एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही तुमच्या सर्वांचा परिचय आमच्या कुटूंबाचा एक नवीन सदस्य तारा बेदी कौशल हिच्याशी करून देत आहोत. अखेरीस आमचे कुटुंब पूर्ण झाले. हम दो हमारे दो. ‘

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER