
सातारा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील यात्रा (Mandhardevi Yatra cancel) कोरोनाचा (Corona)प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रद्द करण्यात आली आहे. पौष पोर्णिमेल देवीची मुख्य यात्रा असते. महाराष्ट्रासह इतर राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांमुळे मांढरदेवीगडावर गर्दी होऊ नये म्हणून १३ फेब्रुवारीपर्यंत मांढरदेवी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
आज पहाटे मांढरदेवी देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी आणि ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांच्या उपस्थित धार्मिक विधी, पूजाअर्चा रुढी परंपरेनुसार पार पडल्या. मांढरदेवी गडावर भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला