कोल्हापूर महापालिकेत ४० नगरसेवकांना सक्तीची विश्रांती

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) २००५, २०१० व २०१५ मधील निवडणुकांतील आरक्षणावर आधारित सोडत निघाल्याने ८१ पैकी ७९ नगरसेवकांना बदलाचा झटका बसला आहे. फक्त दोन प्रभागांत मागील आरक्षण कायम राहिले आहे. तब्बल ४० नगरसेवक निवडणूक रिंगणाबाहेर राहणार आहेत. संबंधित नगरसेवकांनी पाच वर्षे घरातच बसून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक मैदानात उतरणार आहेत. थेट आरक्षण बदलल्याने अनेक नगरसेवकांचा पत्ता कट झाला. परिणामी, निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या २५ नगरसेवकांना प्रभागात घुसखोरी करण्याशिवाय पर्याय नाही.

निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने प्रभागातून इच्छुकांची धामधूम सुरू झाली आहे. मागील सभागृहातील नगरसेवक मात्र सावध पावले उचलत आहेत. ज्या प्रभागांचे आरक्षण बदलले आहे, तेथील नगरसेवक प्रभाग सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. मी नाही तर माझ्या कुटुंबातील व्यक्ती, असे म्हणून पती, पत्नी, आई, वडील, सासू, सासरे, मुलगा, भावजय यासह नातेवाईकांपैकी एकाचे नाव पुढे आणत आहेत. काही नगरसेवकांच्या प्रभागातील आरक्षण बदलूनही फक्त हाबकी डाव टाकण्यासाठी उमेदवारी जाहीर करत आहेत. अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील आरक्षण बदलले असले, तरी त्यांना तेथूनच निवडणूक लढविता येता येणार आहे. त्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. १२ नगरसेवकांची अवस्था तळ्यात-मळ्यात झाली आहे. दरम्यान, आरक्षण कायम राहिल्याने त्याच प्रभागातून माजी महापौर अॅड, सूरमंजिरी लाटकर व छाया पोवार रणागणांत उतरणार आहेत.

निवडणूक न लढवणारे मावळत्या महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर माधवी गवंडी, स्वाती यवलुजे, शोभा बोंद्रे, सरिता मोरे, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, डॉ. संदीप नेजदार, माधुरी लाड, अशोक जाधव, अर्चना पागर, रत्नेश शिरोळकर, अर्जुन माने, राजाराम गायकवाड, दिलीप पोवार, आशिष ढवळे, सीमा कदम, सुरेखा शहा, कमलाकर भोपळे, मेहजबीन सुभेदार, जय पटकारे, किरण शिराळे, ईश्वर परमार, सचिन पाटील, शमा मुल्ला, विलास वास्कर, भाग्यश्री शेटके, नियाज खान, विजय सूर्यवंशी, सुनंदा मोहिते, शेखर कुसाळे, अनुराधा खेडकर, प्रताप जाधव, अजित राऊत, अश्विनी बारामते, वहिदा सौदागर, विजय खाडे-पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, प्रतीक्षा पाटील, मेघा पाटील, गीता गुरव.

निवडणूक रणांगणात पुन्हा उतरणारे…

शारंगधर देशमुख, माजी महापौर हसीना फरास व अश्विनी रामाणे, सत्यजित कदम, कविता माने, प्रतिज्ञा उत्तुरे, पूजा नाईकनवरे, स्मिता माने, मुरलीधर जाधव, जयश्री चव्हाण, भूपाल शेटे, राहुल माने, इंदुमती माने, राजसिंह शेळके, राहुल चव्हाण, उमा इंगळे, संदीप कवाळे, जयश्री जाधव, सविता भालकर, महेश सावंत, रूपाराणी निकम, वृषाली कदम, मनीषा कुंभार, अभिजित चव्हाण, वनिता देठे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER