मनवाची नवी इनिंग

Manava Naik

आजवर आपण अनेक मालिकांमध्ये प्रेमकथा पाहिल्या; पण आता लवकरच कलर्स मराठी एक वेगळी प्रेमकथा आपल्या भेटीला घेऊन येत आहे. येत्या ३१ ऑगस्टपासून कलर्स मराठीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही वेगळ्या विषयांची मालिका येणार आहे. ही मालिका का खास आहे ते बघूया. ही मालिका फक्त एक प्रेमकथा नसून ‘वजनदार प्रेमा’ची अनोखी गोष्ट असणार आहे. ही मालिका काय वेगळं घेऊन येणार हे बघणं उत्सुकतेचा विषय आहे. मराठी मालिका नेहमीच नव्या विषयावरील मालिका घेऊन आपल्या भेटीला येत असतात. आता ही मालिकादेखील नक्कीच वेगळी असणार यात शंका नाही.

लॉकडाऊन दरमान्य या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच मालिका आपल्या भेटीला येणार असून या मालिकेत काय वेगळं बघायला मिळणार आहे बघूया. मालिकेतील दोन्ही कलाकार हे नवीन असून त्यांना बघण्याची एक वेगळी उत्सुकता आहे. अभिनेत्री अक्षया नाईक आणि अभिनेता समीर परांजपे यांची हटके केमिस्ट्री मालिकेत बघायला मिळणार आहे. लॉकडाऊन आधी शूट झालेल्या नव्या मालिका हळूहळू आपल्या भेटीला येणार असून ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येत असल्याची माहिती कलर्स मराठी वाहिनीने दिली आहे.

अंगाने जाड असलेली मुलगी जिला लग्नासाठी नकार येतात ती आहे तिच्या योग्य साथीदाराच्या शोधात जी व्यक्ती तिच्या वजनापेक्षा तिच्या मनाचं सौंदर्य पाहील . आता असा योग्य साथीदार तिला सापडणार का ? हे मालिका बघून आपल्याला समजणार आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा एक वेगळा विषय असतो. आपला पार्टनर हा आपल्या मनासारखा आपल्याला समजून घेणारा असावा अशी इच्छा प्रत्येक मुलीची असते तर आता बघूया या मालिकेतील अभिनेत्रीला तिचा साथीदार सापडतो का ? सोबतीने एका जाड मुलीला एखादा साथीदार शोधण्यासाठी काय काय कसरत करावी लागते हे बघायला मज्जा येणार आहे; पण एकीकडे एकदम कसरत करून फिट राहणाऱ्या या हिरो मुलाला मात्र फिट बायको हवी असते तर नक्की काय होणार आहे या मालिकेत हे बघणं नक्कीच मजेदार असणार आहे. “संसार हिट पाहिजे तर मन सुपरहिट असावं लागतं. ” असं या मालिकेतील अभिनेत्री बोलते. दोन वेगळ्या विचारांचे लोक आणि त्यांचे भिन्न स्वभाव यांची मजेशीर गोष्ट या मालिकेत नक्की बघायला मिळणार आहे.

चित्रपट असो की मालिका मराठीत नेहमीच विषय हाताळले जातात आणि त्यांना प्राधान्य दिलं जातं. मराठीत अशा नव्या विषयांना घेऊन मालिका केल्या जातात हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून एका लठ्ठ मुलींची गोष्ट आपल्या समोर येणार आहे. हल्ली लार्ज साईज किंवा बॉडी शेमिंगसारख्या विषयावर फार बोललं जात नाही. अशा विषयावर फक्त टीका केली जाते तर आता या मालिकेच्या निमित्ताने हा विषय आपल्यासमोर येणार आहे.

मालिकेचे प्रोमो बघून नक्कीच मालिका काही तरी हटके विषय घेऊन येणार आहे; पण ही ‘वजनदार लव्ह स्टोरी’ कशी असणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य किती महत्त्वाचं आहे हेही मालिका दाखवणार यात शंका नाही. मालिकेचा विषय खूप वेगळा आणि आजच्या पिढीला भावणारा आहे हे या प्रोमोमधून कळतंय. आज अनेक जाड मुलींना त्यांच्या जाड असण्यावरून काही तरी बोललं जातं; पण या मालिकेतील अभिनेत्रीची हीच गोष्ट सुपरहिट ठरणार.

अभिनेत्री-दिग्दर्शक मनवा नाईक (Manava Naik) ही मालिका दिग्दर्शित करत असून मनवाचं यासाठी कौतुक आहे. या मालिकेतून दोन नवीन चेहरे प्रेक्षकांना बघायला मिळतील. स्वभाव वेगळे पण आता मन जुळणार का ? हा प्रश्न लवकरच सुटणार आणि मालिका आपल्या भेटीला येणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER