मनसे मराठी तरुणांसाठी सरसावली ; बॅनरच्या माध्यमातून अदानी कंपनीने रोजगाराची संधी देण्याची मागणी

Maharashtra Today

मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेने नेहमी मराठी तरुणाच्या हा हक्कासाठी लढत असते . मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाची धुराही आता उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) गेलीय. त्या पार्श्वभूमीवर आज विमानतळ परिसरात अदानी यांच्या स्वागतासाठी मनसेने बॅनर(MNS Banner) लावले आहेत. अदानी कंपनीने यापुढे मराठी तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी या बॅनरद्वारे करण्यात आली. इतकंच नाही तर मुंबई विमानतळावर मराठी भाषा आणि अस्मितेचा मान राखला गेला पाहिजे, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक भूमिपुत्रास रोजगार देण्यास आग्रही असावे. मुंबई विमातळाची धुरा सांभाळताना मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मान सन्मान राखलाच पाहीजे ही आपल्याकडून अपेक्षा आहे. तसंच आपणास जे सहकार्य लागेल त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर असेल’, असं बॅनर मनसेकडून लावण्यात आलं आहे. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, गौतम अदानी आणि मनसेचे महाराष्ट्र सरचिटणीस नयन कदम यांचा फोटो या बॅनरवर आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button