परदेशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यास भारतात प्रथमच झाली जन्मठेप

कोचीच्या ह्यएनआयएह्ण कोर्टाचा निकाल

man who joined ISIS sentenced to life imprisonment by NIA court

कोची: भारत आणि त्याचा मित्रदेश असलेल्या इराकविरुद्ध युद्ध पुकारण्यासह ्न्य गुन्ह्यांसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) येथील विशेष न्यायालयाने `इस्लामिक स्टेट` (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या केरळमधील एका हस्तकास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

भारतीय दंड विधानाच्या (IPC) कलम १२४ अन्वये भारताविरुद्ध तर कलम १२५ अन्वये भारताच्या आशिया खंडातील एखाद्या मित्रराष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणाºयास शिक्षा देण्याची तरतूद आहे. परदेशाविरुद्ध युद्ध  पुकारल्याबद्दल कलम १२५ अन्वये भारतात ठोठावली गेलेली अशी ही पहिलीच शिक्षा असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. कृष्णकुमार यांनी सुबहानी हाजा मोईद्दीन या ३४ वर्षांच्या आरोपीस ही शिक्षा ठोठावली. याखेरीज मोईद्दीन यास २.१० लाख रुपयांच्या दंडही झाला. ह्यइस्लामिक स्टेटह्ण ही बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (ULAPA) बंदी घातलेली संघटना असल्याने त्या कायद्यान्वयेही मोईद्दीनला शिक्षा झाली.

मोईद्दीन हा केरळच्या इदुक्की जिल्ह्यातील थोडुपुझा गावाचा आहे. `एनआयए`ने दाखल केलेल्या व कोर्टाने ग्राह्य धरलेल्या पुराव्यांनुसार मोईद्दीन एप्रिल २०१५ मध्ये `इसिस`मध्ये दाखल झाला. नंतर तो इराकला गेला. तेथे मोसुल येथे शस्त्रप्रशिक्षण घेऊन त्याने त्यावेळी `इसिस`ने इराक सरकारविरुद्ध पुकारलेल्या युद्धात भाग घेतला. नंतर तो भारतात परत आला. भारतात परत आल्यावरही त्याचे `इसिस`शी संबंध कायम होते व त्यांच्यासाठीच स्फोटके खरेदी करण्यासाठी तमिळनाडूत शिवकाशी येथे जात असताना ऑक्टोबर 2016 मध्ये अटक झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER