सख्या भाच्यानेच केला मामीवर बलात्कार

घरात भांडे नव्हते म्हणून स्वयंपाक करण्यासाठी गेली होती पिडीता

Rape

कामासाठी गाव सोडून शहरात आलेल्या पिडीतेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. दुर्देव असे सख्या मामीवर भाच्यानेच बलात्कार केल्याची फिर्याद १२ फेब्रुवारी रोजी छावणी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. विकास उर्फ बबुदंर पाल २२ असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या बाबत अधिक माहीती अशी पिडीत आणि तीचा पती हा कामासाठी काही दिवसांपूर्वी शहरात आले होते. त्यामुळे घरात स्वयंपाक करण्यासाठी भांडे नव्हते. त्यामुळे पिडीतेच्या पतीने तीला स्वयंपाक करण्यासाठी शेजारीच रहाणाऱ्या भाच्याच्या घरात पाठवले. त्याचाच फायदा घेत विकासने पिडीतेवर अत्याचार केले. ४ फेब्रुवारी ही घटना घडली. त्या नंतर पिडीतेने पोलिसांकडे धाव घेताच विकासने पळ काढला. त्याला शोधण्यासाठी छावणीचे पथक रवाना झाले आहे. पोलिस निरीक्षक पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ठोकळ पुढील तपास करीत आहेत. आरोपी विकास हा मजुरी काम करतो तर पिडीतेचा पती देखील मजुरी काम शोधाण्यासाठीच शहरात आले आहेत.

दुचाकीवर मुलीला घेवून जाणाऱ्या विवाहीतेचा विनयभंग

दुचाकीवर मुलीसह जाणार्‍या विवाहीतेचा पाठलाग करुन तिचा हात धरत विनयभंग करणार्‍या बुलेट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ फेब्रुवारी रोजी पिडित महिला दुचाकीवर मुलीला घेवुन घरी परतत असतांना बुलेटस्वार (क्रं. एमएच-४१-एजे-०३३३) ऋषिकेश निकस (त्याचा पत्ता पिडीतेला माहीती नाही ) हा त्यांचा पाठलाग करुन पिडितेच्या घराजवळ आला. व त्याने पिडितेचा हात धरण्याचा प्रयत्न केला. प्रकरणात पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन बुलेटस्वाराविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनेचा विनयभंग

घरात काम करत असतांना २१ वर्षीय सुनेला नकोसा स्पर्श करुन जबरदस्तीने मिठ्ठीत ओढुन तिचा विनयभंग केला. पिडित सुनेने विरोध केला असता संशयीत सासर्‍याने पिडितेला शिवीगाळ करुन पाहुन घेण्याची धमकी दिली. नात्याला काळीमा फासवणारी ही घटना १९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली होती. प्रकरणात पिडित सुनेने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत ४५ वर्षीय सासर्‍या विरुद्ध हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.