कोणतीही वस्तू चिटकते! पण तो चुंबक नाही हे आहे …

Man has a unique ability to make any object stick to him

तेहरान : जगात असे बरेच लोक आहे, ज्यांच्याकडे काही असामान्य क्षमता असतात. अशा व्यक्तींपैकी एक आहे इराणमधील अबोलफज्ल साबिर मोख्तारी (Abolfazl Sabir Mokhtari). अबोलफज्ल याच्या शरीरावर कोणतीही वस्तू चिटकते! त्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

‘द सन’ने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. अबोलफज्लच्या शरीरावर कोणतीही काच, लोखंड, लाकूडाची वस्तू / धातू एवढेच नाही तर वनस्पतीही चिटकतात! असे वाटते की तो चालत – बोलता चुंबक आहे.

पण, अबोलफज्लच्या शरीरात कोणतेही चुंबक नाही किंवा अलौकिक शक्ती नाही. तो म्हणतो हे कोशल्य आहे. ज्यामुळे तो आपल्या शरीरावर कोणतीही वस्तू चिकटवू शकतो. ही कला त्याने अगदी कमी वयात अवगत केली आहे. अबोलफज्ल फक्त स्वतःच्या शरीरावरच वस्तू चिटकवू शकतो असे नाही तर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावरही तो बऱ्याच वस्तू चिकटवू शकतो!

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button