‘मातोश्री’वर धमकीचे फोन करणाऱ्याला अटक

- एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मोठी कारवाई

Man arrested for threatening call to cm Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही धमकीचा फोन गेला होता. या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक (Encounter Specialist Daya Nayak) यांनी मोठी कारवाई करत कोलकाताहून आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. यासंबंधी आज (१२ सप्टेंबर) ४ वाजता पत्रकार परिषदेत अधिक माहिती समोर येईल .

धमकीच्या फोन प्रकरणी क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींना कोलकाताहून ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबईवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER