ममतांना आठवले, ‘मी हिंदू आहे!’

CM Mamata Banerjee

नंदीग्राम : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मंगळवारी नंदीग्राममधील (Nandigram) निवडणूक प्रचारसभेत सांगितले – मी पण हिंदू मुलगी आहे!

तृणमूलच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात अल्पसंख्यकांची मतपेढी जपण्यासाठी ममता हिंदूंशी फटकून राहात होत्या. इतक्या की, ‘बजरंग बली की जय’ आणि ‘जय श्रीरामा’च्या घोषणांनीही त्या संतापतात. भाजपाने (BJP) ममतांच्या विरोधात हा मुद्दा आक्रमकपणे रेटला. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या बसलेल्या दणक्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, फक्त अल्पसंख्यकांच्या मतांच्या भरोशावर निवडणूक जिंकता येणार नाही. त्यामुळे ममता अधूनमधून हिंदुत्व कुरवाळत असतात.

ममतांचे सरकार मुसलमानांना झुकते माप देते, भाजपाच्या या आरोपाला उत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मीसुद्धा एक हिंदू मुलगी आहे. माझ्यासोबत हिंदुत्ववादाचा खेळ खेळू नका. ममता बॅनर्जी यांनी सभेत चंडीपाठचे पठण केले. मी रोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठ करते, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER