ममतादीदीला चालतील राहुलबाबा?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला सात दिवस वेळ असला तरी मोदीविरोधकांच्या वणीत हालचाली सुरू झाल्या आहेत. निकालानंतर धावपळ नको म्हणून आधीच मित्रपक्षांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू  झाले आहेत. खुद्द सोनिया गांधी यांनी फोनाफानी सुरू केल्याची चर्चा आहे. यूपीएमध्ये नसलेल्या जगनमोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांच्याशीही बोलायचा त्यांचा प्रयत्न आहे. निकालाच्या दोन दिवस आधी सर्व मोदीविरोधक नेत्यांची एक बैठक दिल्लीत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी आणि मायावती यांनी अशी बैठक घाईची होईल असे सांगितले असले तरी काँग्रेसने आशा सोडलेली नाही.

ही बातमी पण वाचा : बंगाल बनले युद्धभूमी

भाजपकडून पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव ठरले आहे. मोदीविरोधकांमध्ये मात्र एकमत होताना दिसत नाही. ममता, मायावती यांची नावं अधूनमधून ऐकायला मिळतात. काँग्रेसकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात. पक्षाने अजून निर्णय केला नसला तरी ते ठरल्यासारखे आहे. सर्वांची एकजूट होत असेल तर आम्हाला राहुल गांधी चालतील, असे तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले; पण मायावती ह्या स्वतः उत्सुक असल्याने एकमत कसे बनवायचे, ह्या चिंतेत काँग्रेसवाले आहेत.

के. चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री विजयन, जगनमोहन रेड्डी, एच. डी. कुमारस्वामी , नवीन पटनायक ह्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या हातात नव्या सरकारची किल्ली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने त्या दिशेनेही आपले दूत पाठवायचे योजिले आहे.

ही बातमी पण वाचा : टीएमसीचा हिंसेत हात असल्याचे पुरावे द्या : ममता बॅनर्जी

ही बातमी पण वाचा : पवारांना करायचे आहे सुप्रियाला मुख्यमंत्री