भाच्याला मुख्यमंत्री करणे हेच ममतांचे लक्ष्य – अमित शहा

Amit Shah - Mamata Banerjee

दिल्ली :- पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना लोकांच्या कल्याणाची काळजी नाही. भाच्याला मुख्यमंत्री करणे हेच त्यांचे लक्ष्य आहे, अशी टीका भाजपाचे (BJP) नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली.

ऑनलाईन संबोधित करताना ते म्हणालेत की, भाच्याला राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनवणे हा तृणमूल काँग्रेसचा अजेंडा आहे. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडण्याची जणू लाट आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होतील तोवर ममता बॅनर्जी या त्यांच्या पक्षात एकटय़ाच उरलेल्या असतील.

तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक बनी सिंह राय यांच्यासह अनेक नेते या मेळाव्यात भाजपामध्ये सामील झाले. तृणमूलची ‘माँ, माटी, मानुष’ ही घोषणा आता ‘हुकूमशाही, खंडणीबाजी आणि तुष्टीकरण’ अशी झाली आहे, अशी टीका असे शहा यांनी हावडा जिल्ह्य़ातील सभेला दूरचित्रसंवादाद्वारे संबोधित करताना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER