जय श्रीरामच्या घोषणांमुळे ममता संतापल्या; भाषण दिले नाही

Mamata Banerjee

कोलकाता : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमि्त्त आयोजित ‘पराक्रम दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी जनतेने जय श्रीरामाच्या घोषणा दिल्याने ममता संतापल्या आणि भाषण न देताच जागेवर परतल्या.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कोलकाता येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही व्यासपीठावर उपस्थित होत्या. ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहताच काही लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा देणे सुरू केले. त्यामुळे ममता संतापल्या. “मला वाटते की सरकारच्या या कार्यक्रमात प्रतिष्ठा ठेवण्याची आवश्यकता आहे. हा कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यक्रम नाही. इथे कोणाला बोलावून त्याचा अपनमान करणे हे शोभत नाही. या विरोधाच्या रुपात मी काहीच बोलणार नाही.” असे म्हणून भाषण न देताच त्या जागेवर जाऊन बसल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER