ममता नंदीग्राम येथून लढणार, तृणमूलच्या २९१ उमेदवारांची यादी घोषित; किती मुस्लिम आणि महिला …

Mamata Banerjee

कोलकाता :- ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विधानसभेची निवडणूक नंदीग्राम येथून लढणार आहेत. त्यांनी आज २९१ उमेदवारांची घोषणा केली. यात १०० नवे चेहरे आहेत. तसेच ५० महिला व ४२ मुसलमान आहेत.

नंदिग्रामचे महत्त्व म्हणजे, हा तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून भाजपात आलेले मोठे नेते शुभेन्दू अधिकारी यांचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भवानीपूर विधानसभा जागेवरुन सोभनदेव चट्टोपाध्याय निवडणूक लढवणार आहे. जे लोक या निवडणुकीचा भाग होऊ शकत नाही त्यांना विधान परिषदेत आणण्यात येईल. दार्जिलिंग, कलिम्पोंग आणि कुर्सियांग या तीन जागांवर आमचे मित्र निवडणूक लढवतील, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, यंदा भाजपाच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी ममता बँनर्जी महाशिवरात्रीच्या दिवशी उमेदवारी दाखल करू शकतात, अशी चर्चा आहे.

ही बातमी पण वाचा : … म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शिवसेनेचे मानले खास आभार 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER