ममताला पुन्हा धक्का, शुभेन्दू यांचे बंधू सौमेंदू यांचा १५ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश

Subhendu Adhikari - Soumendu Adhikari - Mamata Banerjee

कोलकाता :- तृणमूल काँग्रेसचे मोठे नेते व माजी मंत्री शुभेंदू अधिकारी (Subhendu Adhikari) यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर आज त्यांचे बंधू व कांथी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सौमेंदू अधिकारी (Soumendu Adhikari) यांनीही १५ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) याना हा मोठा धक्का आहे. कांथी नगरपरिषदेत २१ नगरसेवक आहेत. आता १५ नगरसेवक भाजपात (BJP) गेल्यानंतर तृणमूलची नपवरची सत्ता गेली.

भाजपात गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांचा भाऊ दिव्येंदू आणि वडील शिशीर अधिकारी हे दोघेही टीएमसीचे खासदार आहेत. पश्चिम मेदिनापूर हा अधिकारी कुटुंबाचा गड मानला जातो. तृणमूलने काही दिवसांपुर्वीच सौमेंदू अधिकारी यांना नगराध्यक्ष पदावरून हटवले आहे. त्यानंतर ते भाजपात जाणार ही चर्चा सुरु होती. आज गेलेत.

अधिकारी म्हणजे मीर जाफर – तृणमूल

अधिकारी कुटुंबाच्या भाजपात जाण्यावर टीएमसीने टीका करताना अधिकारींना मीर जाफर म्हटले. जोपर्यंत पदावर होते तोपर्यंत टीएमसीत होते; पदावरून हटवले तसे ते भाजपात गेले. अधिकारींचे हे वागणे मीर जाफरसारखा आहे, असा शेरा मारला. मीर जाफरला बंगालमध्ये कुणालाही आवडत नाही, असेही तृणमूलने म्हटले आहे.

मीर जाफर

मीर जाफर हा १७५७ ते १७६० दरम्यान बंगालचा नवाब होता. त्या आधी तो सिराजउद्दौलाचा सरसेनापती होता. पण, बंगालचा नवाब होण्यासाठी प्लासीच्या लढाईत ब्रिटीशांना जाऊन मिळाला. त्याच लढाईने भारतात ब्रिटीश सत्तेचा अंमल सुरू झाला. त्यानंतर भारतीय इतिहासात मीर जाफरची ओळख देशद्रोही, गद्दार अशी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER