हिंमत असेल तर मलाही अटक करा, टीएमसीच्या दोन नेत्यांच्या अटककेनंतर ममता भडकल्या

Mamata Banerjee

कोलकाता : नारदा स्टिंग ऑपरेशन (Narada sting operation) प्रकरणी सीबीआयने (CBI) आज एका मंत्र्यासह दोन आमदार आणि एका नेत्याला अटक केली. यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) भडकल्या ‘आमच्या नेत्या आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे.हिंमत असेल तर मलाही अटक करा’, असे आव्हान त्यांनी सीबीआयला दिले.

‘नारदा’ घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालय असलेल्या निजाम पॅलेसमध्ये पोहोचल्या. मंत्र्यांना आणि नेत्यांना अटक करताना नियमांचे पालन केले नाही, असा आरोप केला. त्या १४ व्या मजल्यावर सीबीआयशी चर्चा करत आहे.

कोर्टाची आणि विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेता या नेत्यांना अटक करण्यात आल्याने ममता बॅनर्जी सीबीआय अधिकाऱ्यांना सवाल करत आहेत, असे टीएमएसीचे नेते अनिंद राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, आज सकाळी सीबीआयने परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी धड टाकली. त्यांना सोबत घेऊन गेली. मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा हकीम यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर सीबीआय विरोधात जोरदार घोषणा देणे सुरू केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button