पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींची जादू कायम; मोदींचा मॅजिक फॅक्टर फेल

Mamata Banerjee - PM Narendra Modi

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज शांत झाली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत मतदान झालं. त्यांचे निकाल २ मे रोजी जाहीर होतील. पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यानुसार पाचपैकी दोन राज्यांत भाजप (BJP) पुढे आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची जादू कायम असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) फॅक्टर फेल होताना दिसत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्रिक मारणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपकडून संपूर्ण ताकद लावण्यात आली होती. अमित शहा, नरेंद्र मोदींपासून अनेक नेते या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. तरीही पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममतादीदींचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. ममतादीदींच्या तृणमूलला एक्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या एक्झिट पोलमध्ये ममतादीदींच्या तृणमूलला १५२ ते १६४ जागा मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर भाजपला केवळ १०९-१२१ जागा मिळताना दिसत आहे. कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी १४८ जागांची गरज आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या निकालानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममतादीदींचा विजय झाल्याचं चित्र समोर येत आहे.

एबीपीच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस वरचढ, ममता बॅनर्जी हॅट्रिक करण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस : १५२ ते १६४, भाजपा : १०९ ते १२१ आणि काँग्रेसला १४ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार ममता बॅनर्जी हॅट्रिक करण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस : १२८ ते १३८ , भाजपा : १३८ ते १४८ आणि डाव्यांना ११ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलनुसार भाजपला मोठे यश मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेस : १२८ ते १३८, भाजप : १३८ ते १४८ तर डावे+ काँग्रेस मिळून ११ ते २१ ठिकाणी विजयी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button