ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा : पंतप्रधान मोदी

PM Modi-Mamata Banerjee

कोलकाता :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान १७ एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारमोहीम राबवली आहे. प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर टीकास्त्र सोडले. ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचे काम करत आहेत. दीदी तुम्हाला राग काढायचा, तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला, असे मोदी म्हणाले.

पहिल्या चार टप्प्यात तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी वर्धमान येथे केला. त्याचबरोबर मतता बॅनर्जी यांचा एकदा पराभव झाला की, त्या परत कधीच निवडून येणार नाहीत. वामपंथी, डाव्यांचा पराभव झाल्यानंतर तेही पुन्हा निवडून आले नाहीत. त्यामुळे दीदी, तुम्ही एकदा गेलात की परत येणार नाहीत, असा टोलाही मोदी यांनी ममता बॅनर्जींना लगावला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान
ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभेत केला. दीदी आणि त्यांचे कार्यकर्ते बंगालमधील अनुसूचित जातीतील आमच्या बांधवांना शिव्या घालत आहेत. त्यांना भिकारी संबोधत आहेत. १४ एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वीच दीदी आणि त्यांच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

शाहांचेही दीदींवर शरसंधान
गेल्या चार टप्प्यात झालेल्या मतदानानंतर ९२ जागा जिंकण्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आतापर्यंत ४ टप्प्यात झालेल्या मतदानानंतर भाजप ९२ पेक्षा जास्त जागा जिंकेल. ममतादीदी आपल्या भाषणात बंगालपेक्षा माझेच नाव अधिक घेतात. त्या जेवढ्या शिव्या मला देतात त्याचा हिशेब नाही, असा टोला अमित शाह यांनी ममतादीदींना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button