दुखापतीनंतर ममता बॅनर्जींचा व्हीलचेअरवरून रोड शो!

Mamata Banerjee - Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) पायाला झालेली दुखापतीनंतर आज रोड शो करणार आहेत. गांधी पुतळ्यापासून ते हजरापर्यंत बॅनर्जी रोड शो करतील. यानंतर जाहीर प्रचारसभाही घेतील. मात्र, निवडणुकीची जाहीरनामा प्रसिद्ध करणार नाही, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बॅनर्जींना दुखापत झाली होती. नंतर त्यांना कोलकातामधील एस. एस. केम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुखापतीनंतर ममता बॅनर्जींची ही पहिली प्रचारसभा आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

यादी जाहीर होण्याची शक्यता
दरम्यान, पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या केंद्रीय निवड समितीची शनिवारी संध्याकाळी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपा शनिवारीच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे बोलले होते. मात्र, यादी जाहीर झाली नाही. बंगालमध्ये अलीकडेच भाजपात सामील झालेल्या अनेक चित्रपट अभिनेतांचीही निवड केल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला. पण मिथुन चक्रवर्ती प्रचार करतील निवडणूक लढणार नाही, असे भाजपाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER