पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची पुन्हा सत्ता?, तर भाजपची जोरदार मुसंडी

Maharashtra Today

कोलकाता : गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हाती येत आहे. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी(Mamata Banerajee) यांच्या तृणमूल काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तृणमूल काँग्रेसने १५१ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींचे सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास सुकर झाला आहे. तर मागच्या निवडणुकीत अवघ्या तीन जागा मिळवणाऱ्या भाजपने मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने जवळपास ११५ जागांवर आघाडी घेतली आहे.

या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस(TMC) की पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या हेतूने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या. मात्र आता हाती येत असलेल्या निकालानुसार ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा स्थापन होण्याची चिन्ह दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button