कोल स्मगलिंग प्रकरणी ममता बॅनर्जींच्या भाच्याची आणि सुनेची सीबीआय करते आहे चौकशी

Coal Smuggling - CBI - Mamata Banerjee - Abhishek Banerjee

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख व पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांचा कोल स्मगलिंग प्रकरणी (Coal Smuggling) सीबीआयने (CBI) तपास सुरू केला आहे. सीबाआयची टीम अभिषेक बॅनर्जींच्या घरी धडकली आहे. अभिषेक यांची पत्नी रूजीरी यांची चौकशी सुरू आहे. यामुळे, सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या संघर्षात नवा भडका उडण्याचे संकेत आहे.

सीबीआयकडून अभिषेक बॅनर्जींना समन्स जारी करण्यात आले आहे, त्यांना २४ तासांत चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. या अगोदरदेखील सीबीआयने अभिषेक बॅनर्जींच्या अनेक निकटवर्तींविरोधात धाडी टाकल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२० रोजी कोलकातामध्ये तृणमूल यूथ काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विनय मिश्रा यांच्या ठिकाणांवर पशू तस्करी घोटाळ्यावरून धाड टाकण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER