ममता बॅनर्जींचे गौत्र ‘शांडिल्य’; असदुद्दीन ओवैसी भडकले!

Mamata Banerjee - Asaduddin Owaisi - Maharastra Today

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपला रोखण्यासाठी ‘हिंदू कार्ड’ काढले आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आपले गोत्र शांडिल्य असल्याचे सांगितले. त्यावर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ममता बॅनर्जींवर हल्ला चढवला आहे. मी शांडिल्यही नाही आणि जानवंही घालत नाही, मग मी काय करू? असा सवाल ओवैसी यांनी बॅनर्जींना विचारला आहे.

“अशा लोकांनी काय करावे, जे शांडिल्य नाहीत किंवा जानवंही घालत नाहीत. जो कोणी ठराविक देवाचा भक्त नाही. ना चालीसाचे पठण करतो. प्रत्येक पत्र जिंकण्यासाठी हिंदू कार्ड खेळतो आहे. हे अनैतिक, अपमानकारक आहे. तसेच हे प्रयत्न यशस्वी होणार नाही.’ असे ट्विट करत ओवेसी यांनी बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

बॅनर्जी काय म्हणाल्या

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हिंदू कार्ड बाहेर काढले. “मी मंदिरात गेले होते. तेव्हा पुजाऱ्यांनी विचारले की तुमचे गोत्र काय? मला आठवले की त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझे गोत्र मां, माटी, मानुष सांगितले होते. पण, आज मला विचारण्यात आले तेव्हा मी सांगितले, माझे गोत्र शांडिल्य आहे.” असे बॅनर्जी म्हणाल्या.

गिरिराज सिंहांचाही ममतांवर निशाणा

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. रोहिंग्यांना मतांसाठी वसवणारे, दुर्गा/काली पूजा रोखणारे, हिंदूना अपमानित करणारे, आता पराभवाच्या भीतीने गोत्र सांगत सुटले आहेत. शांडिल्य गोत्र सनातन आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, मतांसाठी नाही, अशा शब्दात गिरिराज यांनी ममतांवर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button