भाजपकडे नेतृत्व करणारा चेहरा नसल्याने ममता बॅनर्जी विजयी- गुलाबराव पाटील

mamata banerjee - Gulabrao patil - Maharashtra Today

जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली, असे गुलाबरावांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर भाष्य केले.

गुलाबराव पाटील म्हणाले की, “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून मोदींचा करिष्मा ओसरला का यापेक्षा राज्याचा विकास कोण करू शकतो, मातीशी कोण जुळला आहे, याचा विचार मतदारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममतादीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’ अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली आहे.” भाजपकडे नेतृत्व करणारा चेहरा नव्हता. म्हणूनच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत, असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जनतेचे शिक्कामोर्तब
गुलाबराव पाटील म्हणाले की, “पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या बाजूने कौल दिला आहे. ममतादीदींचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नसल्याने दीदींच्या बाजूने जनमताचा कौल दिला आहे. ममतादीदींनी राज्याचे नेतृत्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते, हे सिद्ध झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button