बंगालची धुरा पुन्हा ममता बॅनर्जींच्या हाती; ५ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ

Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची धुरा हातात घेणार आहेत. येत्या ५ मे रोजी त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. ५ मे रोजी राजभवनात त्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली. तसंच ६ मे रोजी विधानसभेचे प्रोटेम अध्यक्ष बिमान बॅनर्जी हे सर्व पक्षांच्या आमदारांना शपथ देतील. त्याचबरोबर बिमान बॅनर्जी यांचीच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज संध्याकाळी राज्यपाल जगदीप धनकड यांची भेट घेतली. या भेटीत पक्षाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. विधानसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देऊन ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची तपसिया इथल्या पक्षाच्या कार्यालयात आज बैठक घेतली. या बैठकीला टीएमसीचे खासदार आणि ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि निवडणुकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button