ममता बॅनर्जींना पुन्हा बसणार धक्का?; चार कॅबिनेट मंत्र्यांची बैठकीला दांडी, चर्चेला विधान

Mamata Banerjee

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) अशी लढत होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी नाराज असलेले तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थित कमळ हाती घेतलं. यानंतरही तृणमूल काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे .

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे चार कॅबिनेट मंत्र्यांनी पाठ फिरवल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. राजीब बॅनर्जी, रवींद्रनाथ घोष, गौतम देव आणि चंद्रनाथ सिन्हा अशी बैठकीला दांडी मारणाऱ्या चार कॅबिनेट मंत्र्यांची नावं आहेत.

त्यामुळे त्यांच्याकडे अनुपस्थितीच्या कारणाची विचारणा करण्यात आली. तीन मंत्र्यांनी कारणं दिली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वनमंत्री राजीब बॅनर्जी यांनी यासंदर्भात कोणतीच माहिती दिली नाही .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER