ममता बॅनर्जींनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

Mamata Banerjee

मुंबई :- विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तृणमूल कांग्रेसने (TMC) दणदणीत विजय मिळवला. तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.ममता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत .

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ममता यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. त्यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील.

आजच्या घडीला ममता बॅनर्जी या भारतातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहे. आपलं प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असंही त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचंही आवाहन केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button