मोदींना राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी चार महिने लागले : ममता बॅनर्जी

PM Modi-Mamata Banerjee

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ७ जून रोजी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण (Free Vaccination) करण्याची घोषणा केली. केंद्राकडूनच संपूर्ण लस खरेदी करण्यात येणार आहे. त्यांच्या या निर्णयावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी टीका केली. आधीच त्यांनी हा निर्णय घेतला असता तर अनेक जीव वाचले असते, असे बॅनर्जी म्हणाल्या. लसीकरणाच्या मुद्द्यावरून बॅनर्जींनी ट्विटदेखील केले आहे.

“राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४ महिने लागले. फेब्रुवारी महिन्यात आणि त्यानंतरही अनेकदा मी मोदींना पत्र लिहिले. सर्वांना मोफत लस देण्याची प्रलंबित मागणी केली. अखेर त्यांनी आमचे म्हणणे ऐकले. कित्येक दिवसांपासून करत असलेल्या मागणीची अमलबजावणी होत आहे. मोदींनी महामारीच्या सुरुवातीलाच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे होते. दुर्दैवाने त्यांनी उशीरा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आधीच अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यावेळी लोकांवर लक्ष केंद्रीत करत लसीकरणाच्या उत्तम व्यवस्थेची अपेक्षा करत आहोत, प्रचाराची नाही.” असे बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button