ममतादीदीने भाजपविरोधात शड्डू ठोकला; विरोधी पक्षांना एकजूट होण्याचे केले आवाहन

Mamata-Banerjee - BJP - Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात शड्डू ठोकला आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर आम्ही सर्व मिळून एकत्रितपणे काम करू. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि लोकांच्या मुद्द्यांवर मिळून काम करू इच्छित आहोत; पण एका हाताने टाळी कधी वाजत नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं आहे. तसंच हे वक्तव्य करून त्यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकल्याचं सांगितलं जात आहे.

मी आमदारांना चर्चेसाठी बोलवलं आहे. कोरोनाविरोधात मोठा लढा द्यावा लागेल. ती आमची प्राथमिकता असेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर गंभीर आरोपही केला. नंदीग्राममध्ये मोठी गडबड करण्यात आली होती. रिटर्निंग ऑफिसरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नंदीग्राममधील निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button