“एकवेळ माझा गळा चिरा; पण शांत राहा !” ममतादीदींचे जनतेला भावनिक आवाहन

Mamta Banerjee

कोलकाता : एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे अम्फान चक्रीवादाळामुळे पश्चिम बंगालमध्ये जवळपास एक लाख कोटींचं नुकसान झालं आहे. या दरम्यान राज्य सरकारकडून ताबडतोब योग्य ती मदत मिळावी यासाठी कोलकाता आणि इतर भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना शांत होण्याचं आवाहन केलं. “एकवेळ माझा गळा चिरा; पण शांत राहा !” असं आवाहन भावनिक आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निदर्शने करणाऱ्या नागरिकांना केलं आहे.

“सरकार दिवस-रात्र काम करून राज्यातील संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सर्व सुरळीत होईल. कृपया शांत राहा. याव्यतिरिक्त मी तुम्हाला एकच सांगेन की, एकवेळ माझा गळा चिरा; पण शांत राहा!” असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पूर्णपणे ठप्प झाली आहे. या परिस्थितीत पश्चिम बंगाल सरकारने तातडीने सोयीसुविधा पुरवाव्यात यासाठी कोलकाता आणि विविध भागांतील शेकडो नागरकांनी रस्त्यावर येत पश्चिम बंगाल सरकारविरोधात निदर्शने केली. बैरकपूर-सोदेपूर बायपास परिसरात आंदोलनकर्त्यांची रस्त्यावर मोठी गर्दी उसळली होती. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान, पश्चिम बंगालची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारला सर्वसामान्यांच्या सहकार्याचीदेखील आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER