पुन्हा व्हीलचेअरवरून ममता बॅनर्जींचा प्रचार; नंदीग्राममध्ये रोड शो

नंदीग्राम : पश्चिम बंगालमधील (West Bengal election) दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या रणरणत्या उन्हात व्हीलचेअरवरून प्रचारासाठी मैदानात उतरल्या आणि त्यांच्या रोड शोला (Road Show) सुरुवात झाली.

ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून (Nandigram Assembly constituency) निवडणूक लढवत आहेत. यांच्याविरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत. अधिकारी हे नंदीग्रामचे विद्यमान आमदार आहेत. यांचे नंदीग्रामवर प्रचंड वर्चस्व आहे. या निवडणुकाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांना मार लागला होता. यामुळे सध्या त्या व्हीलचेअरवरूनच प्रचार करत आहेत. आजही व्हीलचेअरवर बसूनच नंदीग्राममध्ये आल्या. रणरणत्या उन्हातही त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

जनसभा आणि रोड शो
ममता बॅनर्जी आज नंदीग्राममध्ये आठ किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. हा रोड शो खुदीराम मोड येथून सुरू होऊन ठाकूर चौकात त्यांचे सभेत रूपांतर होणार आहे. मात्र, रोड शो सुरू झाल्यानंतर बॅनर्जी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गावांच्या दिशेने मोर्चा वळवला, असे सूत्रांनी सांगितले. दुपारी १.३० वाजता ठाकूर चौकात बॅनर्जी यांची जनसभा होणार आहे. त्यानंतर २ वाजता बोयल द्वितीय येथे सभा होईल. ३.३० वाजता नंदीग्रामच्या अहमदाबाद हायस्कूल मैदानावर या जनसभेला संबोधित करणार आहेत.

उन्हात रोड शो
पश्चिम बंगालमध्ये उन्हाचा पारा चढला आहे. तरीही या रणरणत्या उन्हात ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरून रोड शोला सुरुवात केली. तापमान जास्त असल्याने उन्हापासून वाचण्यासाठी त्यांनी डोक्याला एक पांढरा कपडा गुंडाळला आहे. तर मतदारांनीही या रोड शोला चांगला प्रतिसाद दिला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते बाबुल सुप्रियो हे आज टॉलीगंज येथे निवडणूक प्रचार करणार आहेत. तर, उद्या ३० मार्च रोजी भाजप नेते अमित शहा नंदीग्राममध्ये येऊन ममता बॅनर्जींना आव्हान देणार आहेत. या प्रचार सभेत अमित शहा काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३० जागांवर मतदान
पश्चिम बंगालमध्ये ३० जागांवर येत्या १ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचाही समावेश आहे. तर, ३० मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, अमित शहा यांच्यासह शुभेंद्रू अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button