ममता बॅनर्जींचे असहिष्णू वर्तन; सुवेंदू अधिकारींना निमंत्रण दिल्याने बैठकीला हजर राहणार नाही!

कोलकाता :- भारताच्या पूर्व किनारपट्टीला ‘यास’ चक्रीवादळाने (Cyclone Yasa) नुकताच तडाखा दिला. ओडिशा, पश्चिम बंगालसह इतर राज्यांतही मोठे नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचे हवाई सर्वेक्षण केले. नुकसान आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकही घेत आहेत. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नकार दिला आहे. कारण, विरोधी पक्षनेते भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित केल्याने ममता बॅनर्जी नाराज झाल्याचे कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कालीकुंडा येथील आढावा बैठकीमध्ये सहभागी होण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. कालीकुंडा येथील बैठकीत यास चक्रीवादळात झालेले नुकसान आणि अन्य माहितीची कागदपत्रे घेऊन ममता बॅनर्जी जाणार असल्याचे समजते. ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयामुळे राज्य आणि केंद्रातील तणाव वाढू शकतो, अशी चर्चा आहे. यास चक्रीवादळाच्या नुकसानीच्या आढावा बैठकीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय मंत्री आणि बंगालमधून खासदार असलेले देबाश्री चौधरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत. यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button