ममता बॅनर्जी पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज; भवानीपूरमधून विधानसभा लढणार

Mamata Banerjee

कोलकाता :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुन्हा एकदा निवडणुकीच्या (Election) रिंगणात उतरणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जी यांना मात्र नंदीग्राममध्ये पराभव पत्करावा लागला होता. ममता यांचेच जुने सहकारी आणि भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा अवघ्या १ हजार ९५६ मतांनी पराभव केला. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती तृणमूल काँग्रेसची झाली.

पण आता ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विधानसभेत जाणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना सहा महिन्यांच्या आत आमदारकी मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यासाठी भवानीपूरचे आमदार आणि कृषिमंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. शोभनदेव यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आपला विभानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शोभनदेव यांनी भाजप उमेदवार रुद्रनील घोष यांचा ५० हजारांच्या फरकाने पराभव केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button