नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर; भाजपचे ग्रह फिरले

Maharashtra Today

कोलकाता :- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत (West Bengal Election Result 2021) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपने टीएमसीच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्वीकारत बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.

आतापर्यंतचे निकाल पाहता असे दिसते की, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सहजपणे सत्तेत येईल. तर ‘अब की बार २०० पार’च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथ  सुरू आहे. संपूर्ण निकालासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जींनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असे म्हणायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button