अटीतटीच्या लढतीत ममतादीदींनी अखेर गड राखला, नंदिग्राममधून १२०० मतांनी विजयी

Mamata Banerjee - Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे (BJP) सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांचा १२०० मतांनी पराभव केला.

पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या १५०० मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत ८००० वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. भाजपाला सुरुवातीला समसमान आघाडी मिळत असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हळूहळू टीएमसीने मोठ्या अंतराने भाजपाला मागे टाकले आणि भाजपाचा हा उत्साह मावळला. टीएमसी जिंकत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे ममतांच्या नंदीग्रामवर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते. यानंतर अखेर नंदीग्राममधून ममतादीदी १२०० जिंकल्या आहेत. अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button