पंतप्रधानपदासाठी राज ठाकरे यांची ममता बॅनर्जींना पसंती?

PM Narendra Modi - Mamata Banerjee - Raj Thackeray

मुंबई :- देशात सध्या तरी भाजपा (BJP) हा सत्ताधारी पक्ष आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या विरोधी पक्ष असल्याचे चित्र आहे, असे म्हणून मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रीय नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांच्या पारड्यात मत टाकून त्यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिल्याचा संकेत दिला.

एका मुलाखतीत ते म्हणालेत की, गेल्या अनेक वर्षात इतकी भांबावलेली राजकीय परिस्थिती मी पाहिली नाही. देशात कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे आणि कोण कुणाचा मित्र आहे हे काळायला मार्ग नाही. एकवेळ अशी येते की आता याचे वाजल; आणि दोन दिवसानंतर कळते की दोघे एकमेकांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) कधी शरद पवारांना (Sharad Pawar) फोन जातो. शरद पवार कधी अमित शहांना भेटतात, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कधी पवारांना भेटतात. म्हणजे २०१४ च्या अगोदर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे काही समीकरण होते का हेच कळायला मार्ग नाही!

ही बातमी पण वाचा : जनतेने मोदींना भाजप तर बाळासाहेबांना शिवसेना सत्ता दिली : राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button