बंगालमध्ये हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार : संजय राऊत

Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) तृणमूल काँग्रेसने (TMC) मोठा विजय प्राप्त केला आहे. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पराभव झाला आहे. यानंतर बंगालमध्ये हिंसाचार उफाळला होता. यापार्श्वभूमीवर बंगालमध्ये विधान परिषद नाही, त्यामुळे त्या शपथ घेऊ शकत नाहीत, असं विरोधकांकडून सांगितल्या जात आहे. यावर शिवसेनेचे खसदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. त्या हरल्या म्हणून काय झालं. ममता दीदींना बंगालच्या जनतेने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. हा विजय केवळ आणि केवल त्यांचा आहे. त्यांच्या समोर बडे नेते होते. त्या सर्वांना त्यांनी भूईसपाट केलं आहे. त्यामुळे हा निव्वळ त्यांचा विजय असून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

बंगालमधील हिंसाचारावर राऊत यांनी चिंता व्यक्त केली . तिथे सध्या ममता बॅनर्जी यांचं राज्य नाही. बंगालच्या जनतेने शांत राहावे . कोरोनाचं संकट आहे. या संकटाचा मुकाबला बंगालच्या जनतेने केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान लोकसभेला पराभूत झालेल्यांना मंत्रिमंडळात शपथ देण्यात आली होती. स्मृती ईराणी, शिवराज पाटील यांनी शपथ घेतली होती. मोरारजी देसाई विधानसभेला पराभूत झाले होते. परंतु त्यांनीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे या किरकोळ गोष्टी उभ्या करण्यात अर्थ नाही. ममता बॅनर्जी या नेत्या आहेत. त्या नंदीग्राममधून हरल्या असल्या तरी बंगालच्या जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या शपथ घेऊ शकतात, असे राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button