बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये फोन करून मदत मागितली; भाजप नेत्याचा दावा

कोलकाता :- आज पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवळणुका सुरू असतानाच भाजप (BJP) नेते प्रलय पाल (Pralay pal) यांनी गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. पाल यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. त्यामुळे ही लढत प्रचंड चुरशीची होणार असून यावर जनतेचे लक्ष लागले आहे. नंदीग्राममधील प्रचार शिगेला पोहचताच पाल यांनी हा गौप्यस्फोट केला. “शनिवारी सकाळी ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला होता. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती.” असे पाल यांनी म्हटले आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिपही भाजपने व्हायरल केली तर आवाज व्हेरिफाईड नसल्याचे टीएमसीने म्हटले आहे.

प्रलय पाल म्हणाले की, “मी त्यांच्यासाठी काम करावे आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा, असे बॅनर्जींचे म्हणणे होते. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंद्रू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपसाठी काम करतो. डाव्यांच्या सत्तेच्या काळात अत्याचार वाढले होते. तेव्हा नंदीग्रामच्या जनतेच्यापाठी केवळ अधिकारी कुटुंबच उभे राहिले. मी कधीच अधिकारी कुटुंबाच्या विरोधात गेलो नाही आणि यापुढेही कधी जाणारही नाही. नंदीग्राममधील लोकांना टीएमसीने कधीच त्यांचा अधिकार मिळवून दिला नाही. त्यामुळे मी भाजपची सेवा करत राहणार आहे. अधिकारी निवडून यावेत म्हणून आम्ही जीवाचे रान करू.”

मालवीय यांचा टोला

या प्रकरणावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे. ममता बॅनर्जी यांनी उपाध्यक्ष प्रलय पाल यांना फोन करून मदत मागितली आहे. पाल यांना टीएमसीमध्ये अपमानित करण्यात आले होते. त्यामुळे ते कुटुंबासह भाजपला कधीच धोका देणार नाहीत. या सर्व प्रकारामुळे ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत होणार हे निश्चित झाले आहे, असे मालवीय यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : भाजपची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’, सचिन सावंत यांची टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER