निवडणूक प्रचारावर २४ तासांची बंदी; ममतांचे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

कोलकाता : वादग्रस्त विधान केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांची प्रचारबंदी केली आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी संतापून  आज दुपारपासून निवडणूक आयोगाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले. ममतादीदींनी मेयो रोडवरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच आंदोलन सुरू केले आहे. परवानगी नसतानाही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना सोमवारी सकाळी ८ ते मंगळवारी रात्री ८ या वेळेत प्रचारासाठी बंदी घातली आहे. या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली होती. सकाळी ९.४० वाजता टीएमसीने लष्कराला पत्र लिहून धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. कमी वेळेत आंदोलनाला परवानगी देणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. मात्र, त्यानंतरही ममतादीदींनी सकाळी ११.३० वाजता आंदोलन स्थळी जाऊन धरणे आंदोलनास सुरुवात केली.

टीएमसीकडून सवाल

दरम्यान, टीएमसी नेत्यांनी निवडणूक आयोगाने लादलेल्या प्रचार मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिलीप घोष, राहुल सिन्हा यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांची वक्तव्ये निडणूक आयोगाला दिसत नाहीत का? निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनलेला आहे, असे टीएमसीचे नेते अणुब्रत मंडल यांनी म्हटले. तर, निवडणूक आयोगाचा हा निर्णय लोकशाहीविरोधी आहे, असांविधानिक आहे. आयोग पक्षपातीपणा करत आहे. भाजप नेत्यांविरोधात कारवाई होत नाही, असा आरोप टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला.

मोदींच्या वक्तव्यानंतर कारवाई?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ  दिवसांपूर्वी बंगालमध्ये रॅली केली. यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच सवाल केले. ममता बॅनर्जींनी उघडपणे मुस्लिमांना एकत्र येऊन मतदान करण्याचे आवाहन केले. तरीही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली नाही. खरं तर त्यांच्या हातून मुस्लिम व्होट बँक निघून गेल्याचे दिसत आहे. जर आम्ही हिंदूंना एकजूट होऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले असते, तर आतापर्यंत निवडणूक आयोगाची नोटीस आली असती, असा आरोप मोदींनी केला होता. मोदींचे हे विधान म्हणजे निवडणूक आयोगाला ममता बॅनर्जींवर कारवाई करण्यासाठीचे अप्रत्यक्ष निर्देशच होते.  त्यामुळेच बॅनर्जींवर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button