चित्रपटात येण्यापूर्वीच मल्लिका शेरावतने केले होते लग्न

Mallika Sherawat

बॉलिवूड स्टार्सचे चाहते अनेकदा आपल्या आवडत्या स्टार्सविषयी काहीतरी नवीन जानण्याचा प्रयत्न करतात आणि सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या चाहत्यांच्या या इच्छेची काळजी घेतात आणि त्यांना स्वतःशी संबंधित काहीतरी सांगतात. तथापि, कधीकधी अश्या काही गोष्टी घळतात, ज्यावर स्टार्स उघडपणे बोलत नाहीत, परंतु हे चाहत्यांनाही माहित आहे. अशा परिस्थितीत आज आपण बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री मल्लिका शेरावतबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ.

मल्लिका शेरावतने २००३ मध्ये ‘ख्वाहिश’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मल्लिकाने पहिल्या चित्रपटात २१ किसिंग सीनद्वारे आपल्या बोल्डनेसची सुरुवात केली. तथापि, मल्लिकाला मर्डर या चित्रपटापासून प्रसिद्धी मिळाली. चित्रपटाची गाणी केवळ सुपरहिट ठरली नाहीत, तर इमरानबरोबर मल्लिकाची जोडीही चाहत्यांना आवडली.

सांगण्यात येते की मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा आहे आणि चित्रपटात येण्यासाठी तिने आपले नाव रीमा वरुन मल्लिका असे ठेवले. यासोबतच मल्लिकाबद्दल असेही म्हणतात की बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्यापूर्वीच मल्लिकाचे लग्न झाले होते आणि नंतर घटस्फोट घेतला.

शिक्षण पूर्ण केल्यावर मल्लिकाने एअरहोस्टेस म्हणून काम केल्याचे सांगितले जाते, तिथे तिची भेट पायलट करणसिंग गिलशी झाली. करणशी मैत्रीची सुरूवात झाली आणि हळू हळू मैत्री प्रेमात बदलली आणि मग लग्न. पण जवळपास एक वर्षानंतर मल्लिका आणि करणचे नातं तुटले, त्यानंतर दोघांचे घटस्फोट झाले. मात्र मल्लिकाने स्वत: हून कधीच याचा उल्लेख केला नाही. मल्लिकाने अशा प्रश्नांना कधीही उत्तर दिले नाही आणि नेहमी अविवाहित असल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे बॉलिवूडबरोबरच हॉलीवूडमध्येही मल्लिकाने ताकद दाखविली आहे. मल्लिकाने जॅकी चॅनबरोबरही चित्रपटात काम केले आहे. मल्लिकाच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलताना अभिनेत्रीने किस किस की किसमत, मर्डर, प्यार के साइड इफेक्ट्स, शादी से पहले, वेलकम, हिस्स, डबल धमाल आणि बिन बुलाए बाराती या सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER