‘मलिक यांनी आरोप सिद्ध करावा, अन्यथा राजीनामा देऊन माफी मागा’, भाजपची मागणी

Praveen Darekar-Nawab Malik

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केद्र सरकारवर गंभीर स्वरुपाचा आणि तितकाच खळबळजनक आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजक्शन विकू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मलिक यांनी याबाबत पुरावे सादर करावे अन्यथा राजीनामा देऊन माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

नवाब मलिक यांनी पुरावे सादर करुन आरोप सिद्ध करावे. जर ते आरोप सिद्ध करु शकले नाही तर त्यांनी राजीनामा देऊन माफी मागावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप करुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मलिक यांची धडपड सुरू आहे. आपली जबाबदारी सरकार पूर्ण करु शकली नाही. आरोग्य यंत्रणांना लागणाऱ्या सुविधा पुरवण्यात महाराष्ट्र्र सरकार अपयशी ठरले, असून गलिच्छ राजकारण करत आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.

तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारनं दोषारोप करणं थांबवावं आणि कठीण काळात स्वत:चं काम करावं असं त्यांनी सांगितले आहे.

त्याचसोबत हा राज्य सरकारचा अधिकृत पवित्रा आहे का? तसे असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी. किंवा मंत्र्यांना असे बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यास रोखले असंही केशव उपाध्ये म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘महाराष्ट्रात रेमिडिसीवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी’, नवाब मालिकांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button