माळेगाव कारखाना निवडणूक; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

Ajit Pawar

मुंबई :- पुणे – बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागला आहे. त्यामुळे आता माळेगाव साखर कारखान्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो.

“लोका सांगे ब्रह्मज्ञान…”, भाजपाचा पवारांना टोला

शरद पवार या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत १९९७ आणि २०१५ च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचंच वर्चस्व राहिलं आहे. मात्र, मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला. त्यामुळे या निवडणुकीत विजय खेचून आणायचाच असा चंग राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बांधलाय. त्या अनुषंगाने त्यांनी कारखाना परिसरात सभा घेत कारखान्याच्या कारभारावर सडकून टीका केली. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी दोन्ही पॅनलसह अन्य १४ अपक्ष असे एकूण ५६ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी आज मतदान होत असून २४ फेब्रुवारीला मतमोजणी होत आहे.