पाकिस्तानचे विमान वसुलीसाठी मलेशियाने केले जप्त! प्रवाशांनाही उतरवले

PIA

क्वालालंपूर : भाडे दिले नाही म्हणून मलेशियाने पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’चे बोईंग ७७७ विमान जप्त केले. क्वालालंपूर येथून हे विमान उड्डाणाची तयारी करतानाच मलेशियाने ते जप्त केले. यातील चालक दल, कर्मचारी आणि प्रवाशांनाही विमानतळावर उतरवण्यात आले! आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मित्र म्हणवणाऱ्या मलेशियाने हा एक मोठा झटका दिला आहे.

पाकिस्तानच्या डेली टाईम्सच्या वृत्तानुसार पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सकडे सध्या १२ बोईंग ७७७ विमाने आहेत. ही विमाने त्यांनी वेळोवेळी कंपन्यांकडून ‘ड्राय लीज’वर घेतली आहेत. जे विमान मलेशियाने जप्त केले तेदेखील भाडेतत्त्वारच घेण्यात आले आहे. परंतु पाकिस्तानने अटींप्रमाणे रक्कम न भरल्यानं हे विमान क्वालालंपूर विमानतळावर जप्त करण्यात आले. यापूर्वी इम्रान खान सरकारकडून सौदी अरेबियाने ३ अब्ज डॉलर्स परत मागितले होते. पाकिस्तानने यासाठी चीनकडून कर्ज घेतले होते. पीआयएने यासंदर्भात एक ट्विट करत मलेशियाने एकतर्फी निर्णय घेत हे विमान जप्त केले, असे म्हटले आहे. मलेशियाचे हे कृत्य अयोग्य आहे, असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER