मालाड : त्रिवेणी नगरमध्ये भीषण आग

Fire In Malad

मुंबई : मालाड भागात भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे सात बंब आणि चार मोठे पाण्याचे टँकर पोहचले आहेत. रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली आहे. ही लेव्हल २ ची आग आहे, असे अग्निशमन दलाने सांगितले.

मालाडमधील त्रिवेणी नगर भागात ही आग लागली आहे. संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे सात बंब दाखल झाले आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अजून लक्षात आले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER