प्रभाग आरक्षण दहा वर्षांनंतरच करा, जाधव यांची सूचना

BMC & Yashwant jadhav

मुंबई : मनपाच्या प्रभागांची रचना बदलण्यावरून वाद सुरु आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी प्रभाग रचना पुन्हा बदलण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी पक्षाचे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी निवडणुकीच्या प्रभागांचे आरक्षण दर दहा वर्षांनी करा, अशी मागणी केली आहे.

जाधव यांनी म्हटले आहे की, प्रभाग आरक्षण दहा वर्षांनी बदलात येईल अशी मनपा अधिनियमांमध्ये सुधारणा करा व त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०२२मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीपासून करण्यात यावी.

नगरसेवकांना असते धाकधूक

प्रत्येक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राखीव प्रभागांची सोडत निवडणूक विभागामार्फत काढतत्. त्यामुळे पुढीच्या वेळेस कोणता प्रभाग आरक्षित होणार आहे याची नगरसेवकांना काळजी असते. नव्या आरक्षणाचा व प्रभाग रचनेचा आपल्याला फटका बसू नये, म्हणून काही नगरसेवक अंदाज बांधून आजुबाजूच्या मतदार संघात काम करत असतात. यामुळे नगरसेवकांचे शेवटच्या एक ते दीड वर्षांमध्ये मतदार संघाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महानगर पालिका क्षेत्रातील निवडणूक प्रभागांची रचना ज्याप्रमाणे दहा वर्षांनी केली जाते, त्याचप्रमाणे प्रभागांचे आरक्षणही दर दहा वर्षांनी व्हावेे, अशी मागणी यशवंत जाधव यांनी केली आहे.

तरतूद

जनगणना अधिनियम १९४८मधील तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी आपल्या देशात जनगणना होते. जनगणना झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील विविध विभागांतील लोकसंख्या विचारात घेेेऊन, क्षेत्रातील निवडणूक प्रभागांची पुनर्रचना करण्यात येते. प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या आटोपशीर व्याप्ती करताना, नागरिकांच्या हिताकरता काही बाबींचे विभाजन होणार नाही याची काळजी घेतत्. पण ७४व्या घटना दुरुस्तीनंतर २००७पासून, विविध सामाजिक घटकांकरता चक्रानुक्रमे(रोटेशन) आरक्षण निश्चित होते. मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम-५ नुसार, जागांच्या एकूण संख्येपैकी पोटकलम २ ते ५ यामध्ये तरतूद असलेल्या संख्येइतकी पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील व्यक्ती, स्त्रिया व नागरिकांसाठी राखून ठेवण्यात येतात. त्यामुळे प्रभाग आरक्षण दर दहा वर्षांनी केल्यास नगरसेवकांचे प्रभागात कामे करण्याकडे पाच वर्षे लक्ष राहील, असा विचार आहे.

कुणाचे ऐकणार?

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रभाग रचना बदलण्याची मागणी केली होती. भाजपाच्या राज्यात २०१७च्या निवडणुकीमध्ये ती बदलली गेली. त्यांनी आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना करनवून घेतल्यामुळे ती रचना बदलण्याची मागणी राजा यांनी केली होती. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दहा वर्षांनी करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेसोबतच प्रभाग आरक्षण बदलण्यात यावे अशी मागणी केली आहे. ठाकरे सरकार कुणाचे ऐकून निर्णय घेते याकडे नगरसेवकांसह विविध पक्षांच्या इच्छुक नगरसेवक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER