खोबरेल तेलाचा असा उपयोग करून चेहरा करा चमकदार

Benefits of coconut oil

खोबरेल तेलाचा असा उपयोग करून चेहऱ्या येवडा चमकदार होयील की लोकं बघतच राहतील. चेहऱ्याचे सौंदर्य हे प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचे असते. आपला चेहरा तजेलदार आणि नितळ दिसण्यासाठी महिलांकडून विविध उपाय केले जातात. कधी रात्रीच्या वेळी झोपताना एखादे लोशन लावून ठेवणे तर कधी सकाळी उठल्याउठल्या चेहऱ्याला एखादा फेसपॅक लावणे असे उपाय केले जातात. इतकेच नाही तर अनेक जणी सातत्याने पार्लरमध्ये जातात. याठिकाणी चेहऱ्यावर होणारे वेगवेगळे प्रयोग आणि त्यामध्ये जाणारे पैसे हे प्रत्येकीला परवडतीलच, असे नाही. पण सुंदर दिसण्यासाठी असे उपाय आवर्जून केले जातात. सणासुदीच्या दिवसांत तर महिलांचा बराच वेळ घरगुती कामांमध्ये जातो. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी काहीतरी झटपट उपाय करण्याकडे त्यांचा कल असतो. अशावेळी बाजारातील विविध उत्पादनेही वापरली जातात. मात्र, ही उत्पादने प्रत्येकाच्या त्वचेला सूट होतील किंवा नाही, हे सांगता येत नाही. तेव्हा घरात सहज उपलब्ध असलेल्या खोबरेल तेलाचा वापर करुन आपण सौंदर्य वाढवू शकतो.

ही बातमी पण वाचा : त्वचा आणि केसांकरिता फायदेशीर तांदळाचे पाणी

coconut oil

  • खोबरेल तेलाचे अनेक फायदे असल्याने विविध ब्यूटी प्रॉडक्टसमध्येही त्याचा वापर केला जातो. यामुळे चेहऱ्याचे मॉइश्चरायझिंग होण्यासाठी मदत होते.

  • खोबरेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात फॅटी अॅसिडस आणि व्हिटॅमिन ई असते, त्याचा त्वचेला अतिशय चांगला फायदा होतो. तुमची त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल त्यावर अतिशय उत्तम उपाय ठरु शकते. शरीराचे डीहायड्रेशन झाल्याने आणि इतरही काही कारणांनी त्वचा कोरडी पडते त्यावर खोबरेल तेल लावणे हा उत्तम उपाय आहे.

  • एकवेळ मेकअप करणे सोपे आहे पण तो काढणे हे एक त्रासदायक काम असते. यातही हा मेकअप जर वॉटरप्रूफ असेल तर काही विचारायलाच नको. अशावेळी खोबरेल तेल अतिशय उपयुक्त ठरते. मेकअप काढण्यासाठी कापसावर थोडे खोबरेल तेल घेऊन त्याने चेहरा पुसल्यास त्याचा अतिशय उत्तम फायदा होतो.

ही बातमी पण वाचा : असा करा सुंदर त्वचेसाठी ग्लिसरीनचा वापर

coconut oil for shiny skin

  • तेलातील घटक मेकअप हायलाईट करण्यास अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे अनेक ब्युटी प्रॉडक्टसमध्ये तेलाचा काही प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे त्वचा तुकतुकीत दिसायची असल्यास हाताला थोडेसे तेल लावून तो हात चेहऱ्यावर फिरवल्यास तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आणि छान दिसू शकता.

  • खोबरेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणूंचा नाश करणारे घटक असतात. चेहऱ्यावरील पुरळ जाण्यास त्याचा फायदा होतो. तेलातील फॅटी अॅसिडसमुळे जीवाणूंचा नाश होतो.

  • तेलामधील घटकामुळे चेहऱ्याचे सूर्याच्या अतिनील किरणांपासूनही संरक्षण होते. त्यामुळे तुमचे काम उन्हात फिरायचे असल्यास तुम्ही घराबाहेर पडताना चेहऱ्याला थोडे तेल लावावे. त्याचा तुमचे उन्हापासून संरक्षण होण्यास निश्चितच फायदा होतो.

ही बातमी पण वाचा : चेहऱ्यावर लावत असाल ‘हे’ ब्यूटी प्राॅड्क्टस तर होऊ शकते नुकसान