‘या संकटसमयी कठोर निर्णय घ्या, आम्ही सर्व आपल्यासोबत !’ फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

Fadnavis-CM Uddhav

मुंबई : देशात आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाला मात देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षानेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काही कडक निर्णय घेतले आहेत. राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदीही घालण्यात असली तरी लोक रस्त्यावर बाहेर पडताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

  कौतुकास्पद! रुग्णसेवेसाठी नर्स म्हणून कामावर रुजू झाली अभिनेत्री; मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक

याबाबतची माहिती खुद्द फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजपा राज्य सरकारसोबत आहे, हे आश्वासन त्यांना दिले. या संकटसमयी आम्ही सर्वच त्यांच्यासोबत आहोत. भाजपा राज्य सरकारसोबत आहे, हे पटवून दिले. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत. तसेच राज्य सरकारला या संकटाचा सामना करण्यासाठी जे काही कठोरातील कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत. रेशन धान्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.