सोनिया गांधींच्याजागी शरद पवारांना UPA अध्यक्ष करा, असे म्हंटलेच नाही : संजय राऊत

Sonia Gandhi - Sharad Pawar - Sanjay Raut - Maharashtra Today

मुंबई : काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले . त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर, आत संजय राऊत यांनी आपण तसे विधान केले नसल्याचा दावा केला आहे. युपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीला मजूबत करण्याची गरज मी व्यक्त केली होती, असेही ते म्हणाले.

संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. कोणाला मी शरद पवारांचा प्रवक्ता वाटत असेल तर मला त्याचा आनंदच आहे. पवार यांच्या विधानांचं समर्थन करणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. शरद पवारांचं काम अतिशय मोठं आहे. त्यांच्या कामगिरीसाठी मोदी सरकारनं त्यांना पद्मविभूषण दिलं आहे. मी शरद पवारांचा असण्याचा-नसण्याचा प्रश्न नाही, असं राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पवारांनी महाराष्ट्रात आदर्श सरकार घडवले, विरोधकांनी तसाच प्रयोग करावा – संजय राऊत

मी अनेकदा सोनिया गांधी,(Sonia Gandhi) राहुल गांधींवर होणाऱ्या टीकेवरही बोललो आहे. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा प्रवक्ता होतो का? सोनिया, राहुल यांच्यावर टीका होत असताना ही सगळी मंडळी कुठे होती?, असा उलट सवालही त्यांनी विचारला. तसेच, सोनिया गांधींच्या जागेवर शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करावे, असे विधान मी केलेच नाही. केवळ, संयुक्त पुरोगामी आघाडीला बळकट करण्यासाठीचं ते विधान होते , असेही स्पष्टीकरण राऊत यांनी दिले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button